युरोपसोबत भारताचा महाकरार

मदर ऑफ ऑल डील्स
तब्बल १८ वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर भारत आणि युरोपीय महासंघ (EU) यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (FTA) शिक्षकमोर्तब झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला 'सर्व करारांची जननी' असे संबोधले आहे.

कराराचे मुख्य पैलू

दोन महाकाय अर्थव्यवस्था जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था (EU) आणि चौथी मोठी अर्थव्यवस्था (भारत) एकत्र आल्याने २ अब्ज लोकांची मोठी बाजारपेठ तयार झाली आहे.
शून्य शुल्क निर्यात भारताच्या कृषी, कापड, दागिने आणि लघुउद्योजकांच्या उत्पादनांना युरोपमध्ये शून्य शुल्कासह प्रवेश मिळेल.
संरक्षण भागीदारी भारत आणि EU मध्ये प्रथमच संरक्षण क्षेत्रात भागीदारी झाली असून, यामुळे सामरिक स्वावलंबन वाढेल.
मोबिलिटी पॅक्ट भारतीय तरुणांना आणि व्यावसायिकांना युरोपमध्ये काम करण्यासाठी व शिक्षणासाठी दारे उघडली जातील.

राजकीय आणि आर्थिक महत्त्व

अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर: अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर, हा करार भारताची पुरवठा साखळी अधिक मजबूत करेल.

आर्थिक स्थिरता: या करारामुळे युरोपीय निर्यातदारांचे दरवर्षी ४ अब्ज युरो वाचतील.

सुरक्षा कवच: हा करार केवळ व्यापारी नसून भारतासाठी एक अभेद्य 'सुरक्षा कवच' ठरेल.

प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया

"हा केवळ करार नसून समृद्धीचा नवा आराखडा आहे." - नरेंद्र मोदी
"आम्ही इतिहास रचला असून ही 'मदर ऑफ ऑल डील्स' पूर्ण केली आहे." - उर्सुला वॉन डेर लेयन (EU अध्यक्षा)
"हा करार वाढत्या टॅरिफ विरोधातील एक स्पष्ट राजकीय संदेश आहे." - अँटोनियो कोस्टा (EU परिषद अध्यक्ष)